चित्रपट :- तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ? (२००८)
गायक, संगीत :- अजय-अतुल
गीतकार :- गुरु ठाकूर
चांगभलं रं देवा चांगभलं रं
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं रं
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं ||धृ||
नाव तुझं मोठं देवा कीर्ती तुझी भारी
डंका तुझा ऐकुनिया आलो तुझ्या दारी
किरपा करी माझ्यावरी हाकेला तू धावं रं
भल्या उंच डोंगरात देवा तुझा वासं रं
मर्जी तुझ्या भक्तावरी देवा तुझी खासं रं
आरं चुकलिया वाट ज्याची त्याला तुझं दार रं
ज्याला न्हाई जागी कुणी त्याचा तू आधार रं
आलो देवा घेउनी मनी भोळा भावं रं
सेवा गोड माझीही मानुनिया घे
न्हाई मोठं मागनं न्हाई खुळी हावं रं
बापावाणी माया तू लेकराला दे
आरं डोई तुझ्या पायावर मुखी तुझं नावं रं
चांगभलं...........
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं रं
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं रं.......