गीतकार :ना. धो. महानोर
गायक :लता मंगेशकर
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर
आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या
एकांताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्या
काही केल्या करमनां, कसा जीवच लागंना
बोलघेवडी साळुंकी, कसा शब्द ही बोलेना
असा रुतला पुढयांत भाव मुका जीवघेणा
चांदण्याची ही रात, रात जळे सुनी सुनी
निळ्या आस्मानी तळ्यांत लाख रुसल्या गं गवळणी
दूर लांबल्या वाटेला रुखी रुखी टेहाळणी
दूर गेले घरधनी बाई, दूर गेले धनी