Author Topic: आला आला वारा, संगे पावसाच्या धारा  (Read 983 times)

Offline tanu

  • Jr. Member
  • **
  • Posts: 99
गीतकार    :सुधीर मोघे
गायक    :आशा - अनुराधा पौडवाल
संगीतकार    :पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट    :हा खेळ सावल्यांचा

आला आला वारा, संगे पावसाच्या धारा
पाठवणी करा, सया निघाल्या सासुरा

नव्या नवतीचं बाई, लकाकतं रुप
माखलं गं ऊनं, जनू हळदीचा लेप
ओठी हासू, पापणीत आसवांचा झरा

आजवरी यांना किती जपलं, जपलं
काळजाचं पानी किती शिपलं, शिपलं
चेतवून प्राण यांना, दिला गं उबारा