Author Topic: गायक :सुमन कल्याणपूर  (Read 1026 times)

Offline tanu

  • Jr. Member
  • **
  • Posts: 99
गायक :सुमन कल्याणपूर
« on: December 11, 2009, 11:30:12 PM »
आली बघ गाई, गाई
शेजारच्या अंगणात
फुललासे निशिगंध
घोटाळली ताटव्यात

आली बघ गाई, गाई
चांदण्यांचे पायी चाळ
लाविले का अवधान
ऐकावया त्यांचा ताल

आली बघ गाई, गाई
लावी करांगुली गाली
म्हणून का हासलीस
उमटली गोड खळी

आली बघ गाई, गाई
लोचनांचे घेई पापे
म्हणून का भारावले
डोळे माझ्या लाडकीचे

आली बघ गाई, गाई
काढीतसे लांब झोका
दमलीस खेळूनिया
झाक मोतियांच्या शिंपा

Marathi Kavita : मराठी कविता