Author Topic: आली हासत पहिली रात, उजळत प्राणांची फुलवात  (Read 814 times)

Offline tanu

  • Jr. Member
  • **
  • Posts: 99
गायक    :लता मंगेशकर
चित्रपट    :शिकलेली बायको

आली हासत पहिली रात, उजळत प्राणांची फुलवात

प्रकाश पडता माझ्यावरती, फुलते बहरुन माझे यौवन
हसली नवती चंचल होऊन नयनांच्या महालात
आली हासत पहिली रात ...

मोहक सुंदर फूल जीवाचे, पती चरणांवर प्रीत अर्पिता
मिलनाचा स्पर्श होता विरली अर्धांगात
आली हासत पहिली रात ...

लाजबावरी मी बावरता, हर्षही माझा बघतो चोरुन
भास तयाचा नेतो ओढून स्वप्नांच्या हृदयात
आली हासत पहिली रात ...