Author Topic: आली माझ्या घरी ही दिवाळी  (Read 887 times)

Offline tanu

  • Jr. Member
  • **
  • Posts: 99
आली माझ्या घरी ही दिवाळी
« on: December 11, 2009, 11:32:34 PM »
गायक    :अनुराधा पौडवाल
संगीतकार    :अनिल - अरुण
चित्रपट    :अष्टविनायक

आली माझ्या घरी ही दिवाळी
सप्तरंगात न्हाऊन आली

मंद चांदणे धूंद श्वास हा, मी तर त्यात भिजावे
जन्म जन्म रे तुझ्या संगती एकरुप मी व्हावे
प्रीत नयनी वसे, लाज गाली हसे
कोर चंद्राची खुलते भाळी
आली माझ्या घरी ही दिवाळी

पाऊल पडता घरी मुकुंदा, गोकुळ हरपून गेले
उटी लावता अंगी देवा, सुगंध बरसत आले
हर्ष दाटे उरी, नाथ आले घरी
सूर उधळीत आली भूपाळी
आली माझ्या घरी ही दिवाळी

नक्षत्रांचा साज लेऊनी, रात्र अंगणी आली
दीप उजळले नयनी माझ्या ही तर दीपावली
संग होता हरी जाहले बावरी
मी अभिसारीका ही निराळी
आली माझ्या घरी ही दिवाळी

Marathi Kavita : मराठी कविता