Author Topic: खेळ कुणाला दैवाचा कळला ?  (Read 1551 times)

Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
खेळ कुणाला दैवाचा कळला ?
« on: December 22, 2009, 02:08:46 PM »
खेळ कुणाला दैवाचा कळला ?
मी असो, तू असो, हा असो, कुणी असो
दैवलेख ना कधी कुणा टळला !

जवळ असुनही कसा दुरावा ?
भाव मनीचा कुणा कळावा ?
खेळ कुणाला दैवाचा कळला ?

हार कुणाची ? जीत कुणाची ?
झुंज चालली दोन मनांची
खेळ कुणाला दैवाचा कळला ?

सौभाग्याला मिळे सहारा
मला न माहित कुठे किनारा
खेळ कुणाला दैवाचा कळला ?

मी असो, तू असो, हा असो, कुणी असो
दैवलेख ना कधी कुणा टळला
खेळ कुणाला दैवाचा कळला ?
 
 
गीत   -   वंदना विटणकर

संगीत   -   राम - लक्ष्मण

स्वर   -   आशा भोसले, उषा मंगेशकर, सुरेश वाडकर

चित्रपट   -   देवता

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: खेळ कुणाला दैवाचा कळला ?
« Reply #1 on: January 02, 2010, 03:00:03 PM »
its very true ........
मी असो, तू असो, हा असो, कुणी असो
दैवलेख ना कधी कुणा टळला
खेळ कुणाला दैवाचा कळला ?