का माणसे वागतात बनुनी मेणाचा पुतळा
फसगत झाली माझी पुरे हा बहाणा
चेहर्यावरती भाव निराळे हृदयात काय....
मजबूर झालाय इथला दिवाना
घेऊन तरी काय फिरावी आठवण
बंद करुनी हृदयी दिवाणखाना
पाहताक्षणी डोळे मिटून घ्यावे
प्रेमिही देतो इथे आसवांचा नजराणा
नाचून सारे घुंगरू तुटले मैफिलीत
शब्दहीन झालाय आज मैखाना
रात्रही इथली वैर्याची अनामिक
उगा खपत बसलाय जागणारा
प्रेम राहिले असे कपट होऊनी
कि, जैसा साकीस छळे पैमाना
रुद्र ...........................
snl_1408@yahoo.com