कधी उभं आयुष्य संपवून जाते
चार दिवसात,
अन् कधी संपता संपत नाही
विरहाची एकरात्र..
कधी निखारे पचवून घेतो, चकोर
चंद्राच्या प्रेमात
अन् कधी अडकून जातो भृंग कमळाच्या पाकळ्यात..
कधी वेळ कसा जातो कळतच नाही तुझ्या सहवासात,
अन् कधी आयुष्य निघुन जाते
तुझी वाट पाहण्यात..
AUTHOR UNKNOWN