Author Topic: नभं उतरु आलं, चिंब थरथर वलं  (Read 941 times)

Offline Siddhesh Baji

  • Jr. Member
  • **
  • Posts: 372
  • Gender: Male

नभं उतरु आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात

अशा वलंस राती, गळा शपथा येती
साता जन्माची प्रीती, सरंल दिनरात

वल्या पान्यात पारा, एक गगन धरा
तसा तुझा उबारा, सोडून रितभात

नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू
गाठ बांधला शालू, तुझ्याच पदरा

Marathi Kavita : मराठी कविता


Offline pandurang

  • Newbie
  • *
  • Posts: 5

Chan ahe kavita !

Nice !