Author Topic: कधी कधी अदिती ...  (Read 1563 times)

Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
कधी कधी अदिती ...
« on: January 23, 2010, 10:55:32 PM »
कधी कधी अदिती, जगताना कुणी आपलं वाटतं
कधी कधी अदिती, तो गेल्यावर एक ते स्वप्न वाटतं
अशात कुणी कसे रोखावे आसवांचे झोके
अन कसे कुणी म्हणावे, Everythings gonna be ok ..

कधी कधी वाटतं, जगण्यात नाही उरली काहीच मजा
कधी कधी वाटतं, दिवसातला प्रत्येक क्षण एक सजा
अशा हदयात कसे पडावे हास्याचे ठोके
अन कसे कुणी म्हणावे , Everythings gonna be ok ..

करतात बघ तुजवर किती प्रेम सगळे
रडतो आम्हीही जर तुझे आसू वाहिले
गाणं येत नाही तरी आम्ही गाऊन पाहिले
अदिती, मानलं जग कधी अंधारलेलं वाटतं
पण रात्रीनंतरच नाही का हे आभाळ उजाडतं

कधी कधी अदिती, जगताना कुणी आपलं वाटतं
कधी कधी अदिती, तो गेल्यावर एक ते स्वप्न वाटतं
अदिती, हस ना हस ना हस ना हस ना हस ना तू आता
नाही तर बन ना थोडी थोडी थोडी थोडी थोडीश्शी स्मिता

तू खुश आहेस तर बघ जग सुंदर दिसतं
सूर्य ढगातून येउन जगात जगणं पसरवतो
ऐक बेभान वारा तुला येउन काय सांगतो
की अदिती, दूर गेलेले परत एकदा भेटतात
अदिती तू बघ, ही फ़ुलं नक्की परत फ़ुलतात

कधी कधी अदिती, जगताना कुणी आपलं वाटतं
कधी कधी अदिती, तो गेल्यावर एक ते स्वप्न वाटतं
अदिती, हस ना हस ना हस ना हस ना हस ना तू आता.

Author - Unknown

Marathi Kavita : मराठी कविता


Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Re: कधी कधी अदिती ...
« Reply #1 on: January 23, 2010, 11:01:34 PM »
i even have MP3. download from here
http://www.4shared.com/file/205246838/1eed756f/Aditi_Marathi.htmlNote : This song is not proprietary of anyone hence posting download link. Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: कधी कधी अदिती ...
« Reply #2 on: January 26, 2010, 04:37:43 PM »
thanks for the link :) ....