Author Topic: नवरी आली.......  (Read 2932 times)

Offline pomadon

  • Jr. Member
  • **
  • Posts: 140
  • Gender: Male
  • प्रमोद पवार...एक मनुष्य प्राणी...
नवरी आली.......
« on: March 02, 2010, 01:18:48 AM »


चित्रपट:-तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं
गायक:-अजय-अतुल, हृषीकेश रानडे, योगिता गोडबोले, प्राजक्ता रानडे
गीतकार:-गुरु ठाकूर
संगीत:-अजय-अतुल

नवरी आली
गो-या गो-या गालावरी चढली लाजेची लाली गं पोरी नवरी आली....
सनईच्या सुरामध्ये चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली...
सजनी मैत्रिणी
जमल्या अंगणी
चढली तोरणं.. मांडवदारी
किणकिण कांकणं
रुणझुण पैंजणे
सजली नटली नवरी आली
गो-या गो-या गालावरी चढली लाजेची लाली गं पोरी नवरी आली....
सनईच्या सुरामध्ये चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली
नव-यामुलाची आली
हळद हि ओली
हे...हळद हि ओली लावा
नवरीच्या गाली
हे.....हळदीनं नवरीचं
अंग सारं माखवा
हे...पिवळी करून तिला
सासरी पाठवा
सजनी मैत्रिणी
जमल्या अंगणी
चढली तोरणं मांडवदारी
सासरच्या ओढीन हि हसते हळूच गाली गं पोरी नवरी आली
सनईच्या सुरामध्ये चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली..
हे...आला नवरदेवं वेशीला
वेशीला गं
देव नारायण आला गं
मंडपातं गणगोतं सारं बैसलं गं
म्होरं ढोलं ताशा वाजी रं..

हे...सासरी मिळू दे तुला
माहेरची माया
हे...माहेरच्या मायेसंगं
सुखाची गं छाया
हे...भरुनिया आले डोळे
जड जीव झाला
हे...जड जीव झाला
लेक जाय सासरा
हे..किणकिण कांकणं
रुणझुण पैंजणं
सजली नटली नवरी आली
आनंदाच्या सरी तुझ्या बरसु दे घरी दारी.... गं पोरी सुखाच्या सरी....
सनईच्या सुरामध्ये चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली.....
हे...आला नवरदेवं वेशीला
वेशीला गं
देव नारायण आला गं
मंडपातं गणगोतं सारं बैसलं गं
म्होरं ढोलं ताशा वाजी रं..


Marathi Kavita : मराठी कविता


Offline Prachi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 206
  • Gender: Female
  • हसरी :-)
Re: नवरी आली.......
« Reply #1 on: March 11, 2010, 11:03:47 PM »
superb song ahe.... maz favorite.... :) :)