चित्रपट :- लग्नाची वरात लंडनच्या घरात
गीत :-भिरकाऊनि भय पराभवाचे
भिरकाऊनि भय पराभवाचे....
खुशाल जगण्यासाठी हवे
स्वप्न उद्याचे एक नवे .......
दिवसामागून रात्री जाती
युगामागुनी युगे संपती
अनंत स्वप्ने या चक्रातच
झिम्म होऊनी विरून जाती
तरी निशेच्या उदरी बसते
पुन्हा उगवत्या दिशेसवे
स्वप्न उद्याचे एक नवे....