Author Topic: असेच काही घडते....  (Read 1457 times)

Offline pomadon

 • Jr. Member
 • **
 • Posts: 140
 • Gender: Male
 • प्रमोद पवार...एक मनुष्य प्राणी...
असेच काही घडते....
« on: July 11, 2010, 08:16:54 PM »

चित्रपट:- गोजिरी
गायक ,संगीत :- मिलिंद इंगळे
गीतकार :- अशोक बागवे

परतीच्या या वाटेवरती असेच काही घडते
निघता निघता वाटच वळते पावलात घुटमळते
असेच काही घडते, असेच काही घडते, असेच काही घडते

डोळ्यां मधला ढगां आडचा पाऊस येतो
प्रतीबिम्बांचा प्रदेश सगळा अंधुक अंधुक होतो

दूर दूर पण पुन्हा नव्याने वीज अशीच चमकते
असेच काही घडते, असेच काही घडते, असेच काही घडते

कधी हसरा दुखवा क्षण यावा निघून जावा
कधी अचानक जावे जखमाच्या गाव
लपून हसरे गाणे मना मनात उमलते
असेच काही घडते, असेच काही घडते, असेच काही घडते

हा रंगांचा शामल हिरवा उजेड आला
आणि दिलेला हात कुणाचा उजळा झाला
काटा कोमल होतो आणिक ह्रुदयी फुलच सलते
असेच काही घडते, असेच काही घडते, असेच काही घडते

फुलातला हा गंध कुणाला दिसला नाही
कसा धरावा मुठीत तारा लपला नाही
हा भाषातून भाषा फिरवा तसे तसेच उमगते
असेच काही घडते, असेच काही घडते, असेच काही घडते

परतीच्या या वाटेवरती असेच काही घडते
निघता निघता वाटच वळते पावलात घुटमळते
असेच काही घडते, असेच काही घडते, असेच काही घडते   

Marathi Kavita : मराठी कविता


Offline NilamT

 • Jr. Member
 • **
 • Posts: 69
Re: असेच काही घडते....
« Reply #1 on: July 12, 2010, 03:15:23 PM »
 :)

Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: असेच काही घडते....
« Reply #2 on: July 12, 2010, 04:13:02 PM »
nice one....... :)

Offline PRASAD NADKARNI

 • Jr. Member
 • **
 • Posts: 378
 • Gender: Male
 • Life:-a combination of adjustments & compromises
Re: असेच काही घडते....
« Reply #3 on: October 26, 2010, 06:55:44 PM »
sundar