अल्बम : पाउस
गायक,गायिका : वैशाली सामंत, अवधूत गुप्ते
संगीत : अवधूत गुप्ते
गीतकार : चंद्रशेखर सानेकर
गीत : पावसा ये रे पावसा
पावसा ये रे पावसा
दे जीवाला दे भरवसा
देते कधीची तुला हाक माझी तृषा
बघ जीवाची किती होतसे काहिली
हि घनांची कवाडे आता कर खुली
धीर नाही रे फारसा
चालता आतुनी जीवनाचा झरा
एक आशा तुझी अण् तुझा आसरा
धाउनी वेगे ये कसा
अंबराचा तुझा देश सोडून ये