Author Topic: ललाटी भंडार - जोगवा  (Read 3168 times)

Offline :) ... विजेंद्र ढगे ... :)

  • Jr. Member
  • **
  • Posts: 122
  • Gender: Male
  • आभाळात अनेक तारे..एकटाच आहे चंद्र!होते अनेक सारे..एकटाच आहे विजेंद्र !
ललाटी भंडार - जोगवा
« on: February 25, 2011, 02:52:00 PM »
नदीच्या पल्याड आईचा डोंगुर, डोंगरमाथ्याला देवीचं मंदिर
घालू जागर जागर डोंगर माथ्याला...
घे ललाटी भंडार, दूर लोटून दे अंधार आलो दुरुन रांगून डोंगर येंगुन उघड देवी दार(2)

नदीच्या पान्यावर आईला पूजत, तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलतं
नाद आला गं आला गं जिवाच्या घुंगराला...
घे ललाटी भंडार, दूर लोटून दे अंधार आलो दुरुन रांगून डोंगर येंगुन उघड देवी दार(2)

नवसाला पाव तू, देवीमाझ्या हाकंला धाव तू,
हाकंला धाव तू, देवीमाझ्या अंतरी र्‍हाव तू,
देवीमाझ्या अंतरी र्‍हावं तू, कामक्रोध परतुनी लाव तू
कामक्रोध परतुनी लाव तू , देवी माझी पार कर 'नाव' तू....
आई सांभाळ सांभाळ 'कुशीत' लेकराला
आई सांभाळ सांभाळ 'कुशीत' लेकराला

डोळा भरून तुझी मूरत पाहीन मूरत पाहीन, तुझा महिमा गाईन
महिमा गाईन तुला घुगर्‍या वाहीन, घुगर्‍या ‍वाहीन तुझा भंडारा वाहीन
द्रुष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला, द्रुष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला
घे ललाटी भंडार, दूर लोटून दे अंधार आलो दुरुन रांगून डोंगर येंगुन उघड देवी दार(2)

यलम्मा देवीचा जागर ह्यो भक्तीचा सागर
प्रेमाची भाकर दाविती ही, जमल्या गं लेकरं
हेऽऽ पुनवंचा चांदवा देवीचा गं मायेचा पाझर
आई तुझा मायेचा पाझर, सागर ह्यो- भक्तीचा सागर

खणानारळानं ओटी मी भरीन,
ओटी मी भरीन, तुझी सेवा करीन
सेवा करीन, तुझा देव्हारा धरीन
देव्हारा धरीन,माझी ओंजळ भरीन
आई सांभाळ सांभाळ तुझेच लेकराला
आई सांभाळ सांभाळ तुझेच लेकराला
घे ललाटी भंडार, दूर लोटून दे अंधार आलो दुरुन रांगून डोंगर येंगुन उघड देवी दार(2)

यलम्मा देवीचा जागर ह्यो भक्तीचा सागर
प्रेमाची भाकर दाविती ही, जमल्या गं लेकरं
हेऽऽ पुनवंचा चांदवा देवीचा गं मायेचा पाझर
आई तुझा मायेचा पाझर सागर ह्यो- भक्तीचा सागर

-जोगवा
- संगीत - अजय अतुल

जबरदस्त संगीत आहे...

-विजेंद्र ढगे-[/i][/b]
« Last Edit: February 25, 2011, 02:59:12 PM by vijendradhage »

Marathi Kavita : मराठी कविता