Author Topic: पप्पा सांगा कुणाचे? - घरकुल  (Read 1844 times)

Offline :) ... विजेंद्र ढगे ... :)

  • Jr. Member
  • **
  • Posts: 122
  • Gender: Male
  • आभाळात अनेक तारे..एकटाच आहे चंद्र!होते अनेक सारे..एकटाच आहे विजेंद्र !

पप्पा सांगा कुणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे
मम्मी सांगा कुणाची? मम्मी माझ्या पप्पांची IIधृII
इवल्या इवल्या घरट्यात
चिमणा चिमणी राहतात
चिमणाचिमणी अन भवती
चिमणी पिले ही चिवचिवती
पप्पा सांगा कुणाचे......II१II
आभाळ झेलती पंखांवरी
पप्पांना घरटे प्रिय भारी
चोचित चोचिने घास द्यावा
पिलांचा हळूच पापा घ्यावा
पप्पा सांगा कुणाचे...... II२II
पंखांशी पंख हे जुळताना
चोचित चोच ही मिळताना
हासती, नाचते घर सारे
हासती छप्पर भिंती दारे
पप्पा सांगा कुणाचे...... II३II


गायक/गायिका:

राणी वर्मा, अरूण सरनाईक आणि इतर

संगीतकार:

सी. रामचंद्र

गीतकार:

शांता शेळके

चित्रपट:

घरकुल