Author Topic: सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला - अपराध  (Read 4248 times)

Offline :) ... विजेंद्र ढगे ... :)

  • Jr. Member
  • **
  • Posts: 122
  • Gender: Male
  • आभाळात अनेक तारे..एकटाच आहे चंद्र!होते अनेक सारे..एकटाच आहे विजेंद्र !
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला !
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला?

गंधित नाजुक पानांमधुनी, सूर छेडिते अलगद कुणी
अर्थ कधी कळणार तुला, धुंदणाऱ्या सुरातला?

निळसर चंचल पाण्यावरती, लयीत एका तरंग उठती
छंद कधी कळणार तुला, नाचणाऱ्या जलातला


जुळता डोळे एक वेळी, धीट पापणी झुकली खाली
खेळ कधी कळणार तुला, दोन वेड्या जीवातला


गीत - मधुसूदन कालेलकर
संगीत - एन्‌. दत्ता
स्वर - सुमन कल्याणपूर, महेंद्र कपूर
चित्रपट - अपराध

:'( :'( :'( - विजेंद्र ढगे -  :'( :'( :'(
« Last Edit: February 25, 2011, 06:57:45 PM by :) ... विजेंद्र ढगे ... :) »