" गारवा "
त्याला पाऊस आवडत नाही, तिला पाऊस आवडतो
ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो
मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही
असल तुझ गणित खर मला काळात नाही
पाऊस म्हणजे चिखल सारा, पाऊस म्हणजे मरगळ
पाऊस म्हणजे गार वारा, पाऊस म्हणजे हिरवळ
पाऊस कपडे खराब करतो, पाऊस वैतागवाडी
पाऊस म्हणजे भिजरी पायवाट, पाऊस म्हणजे झाडी
पाऊस रेंगाळलेली काम, पाऊस म्हणजे सुटी उगाच
पावसामध्ये गुपचूप निसटून, मन जाऊन बसते ढगात
दरवर्षी पाऊस येतो, दरवर्षी अस होत
पावसावरून भांडण होऊन लोकामध्ये हसं होत
पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते
पावसासकट आवडावी ती म्हणून ती हि झगडते
रुसून मग ती निघून जाते, भिजत राहते पावसात
त्याच - तीच भांडण अस ओल्याचिंब दिवसात
झाडाखाली बसलेले कोणीकोठे रुसलेले
चिंब मनी, आज पुन्ही, आठवणी, मेघ जुना कोणी भिजलेले !! धृ !!
वार्यातूनी , पाण्यातुनी, गाण्यातुनी, भिजला
पाऊस हा माझा तुझा आता ऋतू सजला
गंध असे, मंद जणू, होऊनिया थेंब जणू, आता टपटपले !! १!!
पाऊस हा, वेडा पिसा पानाफुलात पुन्हा
खूप जुन्या, आज खुणा, डोळ्यात थेंब खुणा
होऊनिया धुंद खरे, आज पुन्हा गार झरे, येथे झरझरले !!२!!
काही कळ्या, काही फुले, काही झुले हलले
काही मनी, काही तनी, काही नवे फुलले
वावरुनी, आज कुणी, सावरुनी आज कुणी, येथे थरथरले !!३!!
गायक :- मिलिंद इंगळे
अल्बम :- गारवा