Author Topic: नाही मी आभाळी.....  (Read 1862 times)

Offline pomadon

  • Jr. Member
  • **
  • Posts: 140
  • Gender: Male
  • प्रमोद पवार...एक मनुष्य प्राणी...
नाही मी आभाळी.....
« on: May 16, 2011, 11:42:16 PM »
  चित्रपट : आटा पिटा
  गायक : स्वप्नील बांदोडकर
  गीतकार : गिरीश साळवी
  संगीतकार : संजीव कोहली

  नाही मी आभाळी.....
  नाही मी पाताळी.....
  सटवाई बनुनी नाही....
  मी तुझ्या भाळी ॥ धृ ॥
  धैर्यवान पावलांचे धरतीशी नाते
  चालता चालता सत्य उकलीत जाते
  नीतीचाचं अग्नी देतो जीवना झळाळी
  नाही मी आभाळी ॥ १ ॥
  कुणी नाही मागे तुझ्या,
  कुणी नाही पुढे
  धावतोस घालून आपुल्या कातड्याचे जोडे
  तुझा कर्म कोळी विनतो...
  एक एक जाळी
  नाही मी आभाळी ॥ २ ॥
  तुझ्या मागे चाले, जेव्हा तुझा... उत्सव
  होते जीवनाचे सार्थक ; सापडतो देवं
  दुसर्यास देऊन देऊन रिती ना हो झोळी
  नाही मी आभाळी ॥ ३ ॥
  अर्थाला त्या अर्थ नाही, ज्यास नाही लाजं
  स्वत:साठी जगण्याचे जग झाले आजं
  जो तो आपुल्या आत्म्या देई .......
  स्वत:हून सुळी
  नाही मी आभाळी ॥ ४ ॥
 
 
 
 

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
तेरा अधिक दोन किती? (answer in English number):