Author Topic: की जिथे असतील परके तेवढे परिवार झाले...  (Read 1765 times)

Offline Vkulkarni

 • Jr. Member
 • **
 • Posts: 188
 • Gender: Male
 • Let's be friends !
  • "ऐसी अक्षरे मेळविन!" आणि "माझी सखी"


*********************************************************************
वादळाशी झुंजले ते मोडले अन ठार झाले
धावले त्याच्यासवे ते काय त्याला ’प्यार’ झाले?

मत्सराने डाग पडले बघ शशीवर कृष्णवर्णी
हे तुझे स्मितहास्य सखये लाघवी हत्यार झाले

त्याच शपथा, तीच वचने, भूलथापा अन् बहाणे
त्याच शस्त्रांचे पुन्हा या काळजावर वार झाले

जानकी वा याज्ञसेनी प्राक्तनाशी हारलेल्या
स्त्रीत्व त्यांचे का स्वतःच्या मस्तकीचा भार झाले?

बास आता....., वैध ठरवा भ्रष्ट माझे वागणेही
रामशास्त्र्यांच्या युगाचे लाड आता फार झाले

का मनस्वी शायराने या जगी बदनाम व्हावे
सभ्यतेच्या मंदिरीही का कमी अपहार झाले

शोधतो आहे कधीचा गाव स्वप्नातील माझ्या
की जिथे असतील परके तेवढे परिवार झाले

*********************************************************************
वृत्त : व्योमगंगा
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगागा
काफिया : ठार, प्यार, हत्यार, वार, भार, फ़ार, अपहार, परिवार
रदिफ़ : झाले

विशाल

Marathi Kavita : मराठी कविता


Offline prasad26

 • Jr. Member
 • **
 • Posts: 103
खूप खूप सुंदर कविता
सुंदर शब्द -सुंदर छंदोबद्ध
विचारांची सुंदर मांडणी
अशाच सुंदर कवितांची आपणाकडून अपेक्षा

Offline atulmbhosale

 • Newbie
 • *
 • Posts: 48
khup khup sundar gazal .
   keep it up. marathit changalyaa gazal karanchi sankhya faar kami aahe. hi univ bharun kaadhanyaache kaam kara. khup khup shubhechha.