Author Topic: देव घावंल का?..----भारतीय  (Read 1437 times)

Offline atulmbhosale

  • Newbie
  • *
  • Posts: 48
देव घावंल का?..----भारतीय
« on: September 11, 2012, 05:32:58 AM »
चित्रपट - भारतीय
संगीत -अजय अतुल
गीत -संदीप खरे (or) गुरु ठाकूर
 
देव घावंल का?........
शोधून शिणला जीव आता रे
साद तुला हि पोचल  का?
दारोदारी हुडकलं   भारी
थांग तुझा कधी लागंल  का?
शाम मुरारी कुंज विहारी
तो श्री हरी भेटलं का?
वाट मला त्या गाभाऱ्याची
आज कुणीतरी दावंल का?
बघ उघडूनी दार अंतरंगातलं   देव घावंल का?........
 
तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात तो
नाचे रंगुनी संताच्या मेळ्यात   तो
तुझ्या माझ्यात भेटंल साऱ्यात तो
शोध नाही कुठे आप साऱ्यात तो
रोज वृन्दावणी फोडीतो  घागरी
तोच नाथाघरी वाहतो कावडी
 गुंतला ना कधी मंदिरी राउळी
बाप झाला  कधी जाहला माउली
भाव ओला जिथे धावला तो तिथे
भाव नाही तिथे सांग धावंल का  ?
बघ उघडूनी दार अंतरंगातलं   देव घावंल का?........
 
राहतो माउलीच्या जीव्हारात जो
डोलतो  मातलेल्या शिवारात तो
जो खुळ्या कोकिळेच्या गळी बोलतो
दाटुनी तोच आभाळी ओथंबतो 
नाचवी वीज तो त्या नभाच्या उरी
होई काठी कधी आंधळ्याच्या करी
घेउनी लाट येतो किनाऱ्यावरी
तोल साऱ्या जगाचाहि तो सावरी
राहतो जो मनी या जनी जीवनी
एका पाषाणी तो सांग मावंल का?
बघ उघडूनी दार अंतरंगातलं   देव घावंल का?........
   
         
« Last Edit: September 11, 2012, 05:34:50 AM by atulmbhosale »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline atulmbhosale

  • Newbie
  • *
  • Posts: 48
Re: देव घावंल का?..----भारतीय
« Reply #1 on: September 11, 2012, 05:34:13 AM »
yaa gitache geetkaar kon mala nakki maahit naahi
maahit asalyaas saangaa.