Author Topic: What Can I Do By Corrs In Marathi....... :)  (Read 1083 times)

Offline Rohit Dhage

  • Jr. Member
  • **
  • Posts: 221
  • Gender: Male
  • Show me the meaning of being lonely....
What Can I Do By Corrs In Marathi....... :)
« on: July 14, 2012, 02:01:51 AM »
मी ह्या दिवसात अजिबात झोपलेली नाहीये..
आपलं बोलणं होऊनही खूप दिवस उलटून गेलेत..
आणि मी कितीतरी वेळा इथे येऊन गेले
मला खरंच कळत नाहीये मी काय चुकीचं करतेय

मी काय करू जेणेकरून तू माझ्यावर प्रेम करशील
काय करू जेणेकरून तू माझी काळजी घेशील..
मी काय म्हणू जेणेकरून तुला ह्याची जाणीव होईल
काय करू जेणेकरून तू इथपर्यंत येशील
 
असं खूप काही आहे जे मी मिळवू शकते
आणि मी ते मिळवीनही, ते परत गमावण्यासाठी
आणि कुणाला माहित, मला बरं सुद्धा वाटेल
जर प्रयत्नच केला नाही, तर आशा सुद्धा नकोच..

आता बस झालं वाट पाहणं, त्रास करून घेणं
नकोत आता ती भांडणं आणि अजून प्रयत्न करणं
 
काही बोलण्यासारखंही आता राहिलेलं नसावं
आणि मजेशीर घेतलं तर मी शांतही झालेलीये
कारण जी लावतेय ती ताकत माझी वाटतच नाहीये
माझ्या आपसूक ती बाहेर येतेय

 मी काय करू जेणेकरून तू माझ्यावर प्रेम करशील
 काय करू जेणेकरून तू माझी काळजी घेशील..
 मी काय म्हणू जेणेकरून तुला ह्याची जाणीव होईल
 काय करू जेणेकरून तू इथपर्यंत येशील...
 
 - रोहित

Marathi Kavita : मराठी कविता