दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक,
ताकाचा केला मठ्ठा, ...... चे नाव घेतो ..... रावान् चा पठ्ठा
भाऊबहिणीच्या प्रेमाचे प्रतिक आहे रक्षाबंधन,
....ना करीते मी रोजच वंदन.
तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल
...ना आवडते गावठी गुलाबाचे फुल
पनिपुरि खाताना लागतो जोरदार थसका, ... ला आवडते बिस्कित ब्रितानिया मस्का - चस्का
हिरवा शालू लेवुनि येतो श्रावण महिना,
.... हाच माझा खरा दगिना.
हिरवा शालू लेवुनि येतो श्रावण महिना,
.... हाच माझा खरा दगिना.
श्रावण महिन्यात सर्वजण करतात श्रवणी सोमवार,
.... सह केले मी हरिद्वार किंवा आहेत दिलदार.
झुळुझुळु वाहे वारा मंद मंद चाले होडी
आयुष्यभर सोबत राहो --- - --- ची जोडी
पुण्यात औन्ध मधे बन्गला उभा आहे ऐटित
जलु नका लोकहो ... राव आहे आय़् टीत
अत्रावळ पत्रावळ , पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड
***** हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड्
सखोल विचार आणि कठीण परीश्रमाला असावी प्रामाणिकपणाची जोड
...चे बोलणे आहे साखरेपेक्षा गोड
कपाळावर लावले कूंकू लाल लाल,
.... च्या जीवावर आहे मालीमाल
भारतीय नारी पतिला देते उच्च स्थान,
...... चे ठेवीन सदोदित मान.
पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,
.... आहेत आमचे फार नाजुक.
थोरातांच्या दुधावर येते जाड साय,
....... ना जन्म देणरी धन्य ती माय
जाईच्या वेलीला आलाय बहार,
..... ना घातला २७ फेब्रुवारीला हार
फुलासंगे मातीस सुवास लागे,
.... नि माझे जन्मोजन्मिचे धागे.
मुर्तीकाराने घडवली सुंदर मुर्ती ,
विलासरावांची वाढो सर्वदूर किर्ती
ग.दी. माडगुळकरांचे रामायण सुधीर फडक्यांनी गायिले
सुरेशरावां करिता मी पुणे पाहीले
चंदनासारखे झिजून करावी सर्वांची सेवा ,
...म्हणतात करु नको कधी दुसर्याचा हेवा
घराच्या पुढे अंगण अंगणात सजलाय बोगनवेल ,
प्रवेश करते गृहलक्ष्मी , वाजवून ...च्या घराची बेल
रुसलेल्या ज्योतीला पवन म्हणतो हास,
------ ना भरवते मी श्रीखण्ड-पुरीचा घास
मंथरेमूळे घडले रामायण,
..... चे नाव घेते आज आहे सत्यनारायण