हे ही तितकंच खरंय..
जे सुंदर मुखडे आठवून जग हरवून जातं..काही बरसून जातं
असं काही सुंदर, हरवून नेणारं..शेक्सपिअर पासून शाहजहान पर्यंत
इतक्या अप्रतिम की ज्या प्रेरणेने त्या बनल्या त्याही फिक्या पडाव्या..
एक निमित्त होते ते चेहरे...क्वचित प्रसंगी ते स्वभाव!!
जे घडवून गेले नकळत स्वर्गीय काही..
ते श्रेय त्यांचे नाही...नसावे....
त्याचे मोल त्या 'निमित्ताला' कळाले असते मग..
आठवावी मोनालिसा..कोण होती ती..
निमित्त..फक्त एक निमित्त!!!
- रोहित