Author Topic: मजा ! (कल्पेश देवरे)  (Read 2563 times)

Offline Kalpesh Deore

  • Jr. Member
  • **
  • Posts: 88
  • Gender: Male
मजा ! (कल्पेश देवरे)
« on: July 30, 2012, 10:45:33 AM »

मजा !

भर दुपारी आभाळ भरून आल्यावर
मी शाळेतून घराची वाट पकडायचो
मध्येच येता रिमझिम पाऊसाची
मी दुप्तरासकट न्हायचो

पुस्तकं ओली, वह्या ओल्या
दु:खं मज नसे न कसलं
आईचा तो गोड धपाटा
मज आठवण होऊनी बसलं

तरी सुद्धा मी कपडे काढुन
दिगंबर बाबा व्हायचो
थेंबे मुखात झेलून झेलून
मस्त मजेत खेळायचो

कवी - कल्पेश देवरे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline milindkurbetkar

  • Newbie
  • *
  • Posts: 17
Re: मजा ! (कल्पेश देवरे)
« Reply #1 on: July 31, 2012, 09:17:40 PM »
chan aahe kavita
god aathvani