Author Topic: तडका - छुप्या कँमेर्‍याचे सत्य,.!  (Read 283 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
छूप्या कँमेर्‍याचे सत्य,..!

कुणा-कुणाच्या नैतिकतेत
नको तितकी खोट असते
त्यांच्यामुळेच माणूसकीला
पून्हा-पून्हा गाल-बोट असते

जणू अनैतिकतेच्या परामर्शाने
विचारच त्यांचे नासवलेले असतात
म्हणूनच महा-कोडगांच्या औलादींनी
कुठे छूपे कँमेरे बसवलेले असतात,..

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३