(अ) प्रिय अतिरेक्यांनो...
मारुन मारुन माराल किती?
हा सव्वाशे कोटींचा देश आहे.
तावुन-सुलाखुन निघालो आम्ही
एकात्मता अजुन शेष आहे.
जिंकल्याची नशा चढेल
हा क्षणभराचा भास आहे.
एकशे पन्नास वर्षे लढण्याचा
पाठीशी आमच्या इतिहास आहे.
लपुन-छ्पुन लढता तुम्ही
औलाद तर भित्र्यांची आहे.
दिसली जी झलक आम्हांला,
ती पिसाळलेल्या कुत्र्यांची आहे.
कधी हिरवा,कधी भगवा
ही तुमची धार्मिक ढाल असते.
वाहिले जाते जे रक्त
ते तर फक्त लाल असते.
तसे तुमचे नापाक इरादेही
कधी पूर्ण होऊ शकत नाहीत.
तिरंग्याची शपथ आहे,
आम्ही उगीच बकत नाहीत.
नाक उचलून बोलतो आम्ही
तुमच्याप्रमाणे नकटे नाहीत.
राहिल जग पाठीशी आमच्या
आम्ही काही एकटे नाहीत.
आमच्या अभंगतेच्या कथा
तुम्हांस कळून चुकल्या आहेत.
झाडल्या गोळ्या,फोडले ब्वांम्ब
त्या आमच्यासाठी टिकल्या आहेत.
हा गैरसमज काढून टाका,
तुम्ही आम्हांला गुलाम करताल !
तुम्हीच"भारत माता की जय" म्हणीत
तिरंग्याला सलाम करताल !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)