Author Topic: भ्रम  (Read 1804 times)

Offline Mangesh Kocharekar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 95
भ्रम
« on: September 25, 2013, 09:04:12 PM »

भ्रम
विरोधी बाकावर आता सारे काही ठीक आहे
मोदींच्या  पाठीवर  आत्ता अडवाणींचा हात आहे
त्यांच्या मदतीसाठी गडकरी; गोपीनाथ आहे
संघाचे भागवत अन राजनाथ यांची साथ आहे
वसुंधरा  अन सुषमा यांना मदतीची हाक  आहे 
जोशी अन जावडेकर यांची जुनीच  वहिवाट आहे
    भगवा फडकवायला जो तो घाईत आहे
   मतांचे आकडे जुळवणे हीच पंचाईत आहे
   जुनी मोट  बांधणे हि दिल्लीची रीत आहे
   प्रत्येक नेत्याला मंत्री बनण्यासी प्रीत आहे
   राज्याच्या नेत्याला केंदाचे नवे गीत आहे 
  चांगल्या नेत्याकडे पद जावे यातच देशाचे हित आहे
राज् पुत्रागत  फिरणे  हे त्याचे नशीब आहे
पक्षाच्या दावणीला हा नियतीचा शाप आहे
त्याच्यासाठी अन्नसुरक्षा हा मोठा हात आहे
पक्ष आता सातवा आयोग मोठ्याने  गात आहे
शिंदे ,चिदंबरम,तिवारी,अन्तोनि जोरात आहे
मीच पंतप्रधान ,जो तो या भ्रमात आहे
मंगेश कोचरेकर

Marathi Kavita : मराठी कविता