Author Topic: आय सी यु ..  (Read 1057 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,266
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
आय सी यु ..
« on: November 10, 2013, 01:06:16 PM »

घड्याळाला भिंतीवर टांगुन
चार दिवस काळ थांबवीत होतो मी !

हॉस्पिटल कसं असत ?
आय.सी.यु.त अनुभवित होतो मी !

थोडं उशीराच समजलं
ई.सी.जी. सुद्धा बंद पाडीत होतो मी !

पराधीन पलंगावर एकटा
सलाईनच्या जाळ्यात होतो मी !

ग्लुकोजच्या गोड तळ्यात,
नर्स, डॉक्टरांच्या स्वाधीन होतो मी !

गोळ्या, औषधांच्या डोसा सह,
भेटणाऱ्यांचे सल्लेही खात होतो मी !
 

© शिवाजी सांगळे
sangle.su@gmail.com  +919422779941
« Last Edit: November 10, 2013, 01:47:56 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता