Author Topic: खेळातील सामान्य  (Read 1976 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,266
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
खेळातील सामान्य
« on: December 06, 2013, 10:15:42 PM »

खेळातील सामान्य !!!


सामान्यांच्या संपत्तीचा 
खेळ मांडला आहे,
भेसळ केलेला मनोरा
सपशेल ‘कलमडला’ आहे !

विदेशी खेळाडूंचा बहिष्कार
आधीच पोहचला आहे,
देशीना जिंकवण्याचा डाव
यशस्वी झालेला आहे !

खेळात डोकवायला,
कॉमनच्या तिकिटाला मोल आहे,
न खेळता देखील स्पर्धेत
पुढाऱ्यांना मात्र भाव आहे !

खेळांमध्ये पैसा आला
पैशांचाच खेळ आहे,
फसगत होणाऱ्या स्पर्धेत
भारत माझा महान आहे !
©शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता