Author Topic: घरजावाई..  (Read 2733 times)

Offline SONALI PATIL

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
घरजावाई..
« on: May 16, 2014, 02:38:32 PM »
        घरजावाई..


घरामध्ये  दाना  नाही, पाणी नाही ।
शेती थोडी नावाला ।।
शिकून सवरून झाल आता ।
बाशिंगाची घाई मला ।।
घोडयावरती बसायचय ।
मंडुळ्या बी बाधांयच्याय ।।
गावो गावी हीडूंन झाल,
नौकरी बी नावाला ।
काळी,नकटी,बूटकी चालेल,
ऐकूलती एक बापाला पाहीजेल ।।
मोठया घरची पोरगी पाहीजेल ।
ताटा खालच होईन माजंर ।।
मान ,पाण होइन माझा..
रूसता फुगता य़ेइल मला ।
माझ्या  साठी,तुम्ही ऐकुलती एकच शोधा..।।
लाडाचा घर जावाई होईल,
हट्ट पुरवायला सासू येईल ।
रोज श्रिखंड पुरीचा बेत होईल,
काळी,नकटी, बुटकी चालेल ।
वेळ पडली तर लगंडी चालेल ,
मोठया घरची पोरगी पाहीजेल ।
बापाला ती ऐकुलती एकच पाहीजेल ।।

Marathi Kavita : मराठी कविता


Offline mandar barve

  • Newbie
  • *
  • Posts: 1
  • Gender: Male
Re: घरजावाई..
« Reply #1 on: July 29, 2014, 04:10:43 PM »
awesome r u writngs poem also