Author Topic: म्हणे देव  (Read 2342 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
म्हणे देव
« on: May 23, 2014, 02:07:02 PM »
म्हणे देव

असा कसा देव तुझा
दगडातच असतो
पैशाच्या पुढे तु
माय-बापाला विसरतो

साधू-संताना देतो तुकिती रे सहारा
मग माय-बापाला तु
का दाविला वारा

दगडाच्या देवाला आहे तुझ्या खिडकीत जागा
म्हातार्या आई-बापाला म्हणतोस
झोपडीत राहात जा

देवाच्या भक्तीत झालास तु गुंग
लोकांना दाखवतोसपुण्यांच सोँग

जगण्याचा नियम केलास तु विचिञ
बाप मेल्यावर घालतोस वरसाला पित्र
पण त्याच दिवशी जित्या आईला
तु घराबाहेर रस्ता का दाविला... ?

 -S.S More

Marathi Kavita : मराठी कविता