Author Topic: वट पौर्णिमा...  (Read 1933 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,266
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
वट पौर्णिमा...
« on: November 02, 2014, 08:49:15 AM »


स्वर्गात म्हणे बांधली जाते
शुभ लग्नाची एक गाठ,
कंटाळून सुद्धा नाही सुटत
एक दुसरयाची सोशिक पाठ !

माहित नाही कुणी दुसरा
जाच एवढा शोशिल का?
भीती एवढी नवरा जातीला
न बोले माहेरा जाशील का?

विसरली आता ती पौर्णिमा
नुसतीच मागे किटकीट उरते,
नवरा हाच दे जन्मोजन्मी
अशीच वटवट करीत असते !


© शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता