Author Topic: साहेबांच्या घरी रोजच असते दिवाळी..  (Read 824 times)

Offline SONALI PATIL

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
साहेबांच्या घरी
रोजच असते दिवाळी..
माहीत नसते त्यांना
काय असते माहागाई ।
खिसा असतो भरून भरून
विचारू नका तो कसा..

साहेबांच्या भोवती असतो रोज
फाईलींचा मोठ-मोठा गठ्ठा।
एका सही साठी
भाव असतो मोठा मोठा..

साहेबांच्या घरी रोजच जातो
मिठाईचा डबा नवा नवा ।

दारू साठी आहेत त्यांच्यात
सेल्फ वेगळे वेगळे ।
वेगवेगळ्या कामाचे
ब्रॅन्ड वेगवेगळे ...

चिंटू च्या शाळेत
असतो एकदा ओपन डे
टिचर सांगते उद्याला
बाबांना जरूर घेऊन ये ।

सहीसाठी कागद आला जेव्हां पुढे
बांबाचे हात गेले
आपोआप पाठी मागे ।

मिनीटा मागून मिनीटे गेली
टिचर होती खोळाबंलेली
पेनाची गफलत समजून
पर्समध्ये हात घालू लागली

पर्स मध्ये हात जाताच
बाबा पूढे सरसावले
लगबगीने कागदावरती
सह्या ते करू लागले ।


sonali patil
Marathi Kavita : मराठी कविता


Offline javsuntion

  • Newbie
  • *
  • Posts: 2
    • gclub
« Last Edit: November 02, 2017, 02:08:00 PM by javsuntion »