Author Topic: मी देशेचा  (Read 510 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,213
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
मी देशेचा
« on: January 26, 2015, 12:45:32 PM »
मी देशाचा

दोनदा होतो केवळ येथे
महा जयघोष भारत देशाचा,
वधारतो फक्त भाव तेंव्हा
फडकत्या तिरंगी झेंडयाचा !

उरल्या तिनशे त्रेसष्ट दिनी
मात्र उरतो झेंडा शोभेचा,
असो दिवस मग कोणताही
मानतो फक्त आम्ही सुट्टीचा !

राहतो अनिवासी जणू इथं
नासतो संबंध कुणा कशाचा,
काय हक्क आम्हा म्हणाया
देश माझा... मी देशाचा?

©शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता

मी देशेचा
« on: January 26, 2015, 12:45:32 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):