Author Topic: आठवणी,...  (Read 3059 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
आठवणी,...
« on: March 12, 2015, 05:24:46 AM »
~!!! तडका !!!~


आठवणी,...

प्रत्येक आठवण जपण्याचा
मनी छंद जडलेला असतो
सुख-दू:खाच्या आठवणींनी
इथे माणूस पीडलेला असतो

असं इथे कुणीच नसेल की
जे प्रसंगांमध्ये हरवत नाहीत
क्षणचित्रे टिपण्याचे मोह सुध्दा
भल्या-भल्यांना आवरत नाहीत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३


दि.१२/०३/२०१५ दै. प्रजापत्र

Marathi Kavita : मराठी कविता