****** आजची वात्रटिका *****
********************************
स्त्रीमुक्तीची व्याख्या
नवर्यापासून मुक्त होण्यालाच
आज स्त्रीमुक्ती म्हटले जाते.
त्रासलेले नवरे भेटले की,
अनुभवाने अधिक पटले जाते.
स्त्रीमुक्तीबरोबर पुरूषमुक्तीचीही
आंदोलने उभी राहू लागली.
आमच्यासारख्या बघ्यांची तर
आयती करमणूक होऊ लागली.
फक्त नवर्यालाच नाही तर
परंपरेलाही नाकारायचे आहे !
मुक्त होणे म्हणजे तरी काय?
जे चांगले ते स्विकारायचे आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)