Author Topic: विश्वासाचा ताल,...  (Read 390 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
विश्वासाचा ताल,...
« on: March 16, 2015, 07:45:57 PM »
विश्वासाचा ताल,...

ज्याच्यावरती विश्वास ठेवला
त्याच्याहून विश्वास उडू शकतो
विश्वास भरलेल्या मनातही
कधी अविश्वास जडू शकतो

विश्वास कधी ढाल असतो तर
कधी तो मायाजाळ असतो
मात्र अविश्वासी निर्णयातही
विश्वासाचाच ताल असतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता