***** आजची वात्रटिका *****
*****************************
प्रगतीचे राजमार्ग
मिंधेजी व्हा,लाचारेश्वर व्हा,
प्रगतीचे मा्र्ग खुले होतील.
तुमच्यावरच्या टिकांचे
आपोआप मग फुले होतील.
कणा मोडलेला असतानाही
देखाव्यापुरते ताठ व्हा.
तुमचे पोवाडे ऐका्यचे तर
तुम्ही दु्सर्याचे भाट व्हा.
खर्याचे काहीच खरे नसते
खोटेपणा करता आला पाहिजे !
नाक घासता घासताच
लाळघोटेपणा करता आला पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)