Author Topic: तडका - घटकपक्षांचे एल्गार  (Read 277 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,478
घटकपक्षांचे एल्गार

देणारांनी अजुन ना दिला आहे
ना मागणारेही थकलेले आहेत
सत्तेत वाटा मिळवता-मिळवता
घटकपक्ष मात्र ठकलेले आहेत,.?

सत्तेतला वाटा देण्याबाबत
देणारे अजुनही गपगार आहेत
मात्र सत्तेसाठी घटकपक्षांचे
एल्गारांवरती एल्गार आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783