Author Topic: अनाथ म्हणजे तरी काय  (Read 307 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
अनाथ म्हणजे तरी काय
« on: May 23, 2015, 01:45:02 PM »
पोटची पोर जेव्हा उकिरड्यात टाकली,
कचर्यानेच तिला सावली दिली,
माये पायी बिचारी कचर्यातच वाढली,
शिळ उष्ट जनावरासारख खात राहीली,
अंगावर फाटक खराब कापड लावलेली,
निरागस मनाची ती कोमल बाहुली,
निर्दयी माणसाचीशिकार बनली,
फेकलेल्या कचर्यात कुठे घास शोधत,
जगत राहीली ती कधी भीक मागत,
माय-बापाचा तिला नाही पत्ता,
तस तिला आता नाही आहे गरज
पण सगळेच का गिरवताहेत हा अमानुष कित्ता,
निरागस त्या बाळाची काय आहे चूक,
वासना अन् अनैतिकतेच्या नादी लागुन,
तरीही भागवता नाही आली त्यांना वासनेची भूक.
तिची हाव फक्त दोन शब्द प्रेमाची.

Marathi Kavita : मराठी कविता