Author Topic: चळवळीचा ताळेबंद  (Read 762 times)

Offline suryakant.dolase

  • Jr. Member
  • **
  • Posts: 190
चळवळीचा ताळेबंद
« on: December 06, 2009, 08:16:27 PM »
*************आजची वात्रटिका *****
*************************************

चळवळीचा ताळेबंद

ज्याला जसे वाटता येईल
तसे बाबासाहेब वाटले आहेत.
चळवळीच्या पाठीराख्यांनी
आपले दुकाने थाटले आहेत.

पुढे तर नेलीच नाही,
मागे मागे ओढीत आहेत !
चळवळीचे हिशोब सारे
सध्या तरी बुडीत आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)  

Marathi Kavita : मराठी कविता