Author Topic: तडका - गडगडणारे ढग हजारो  (Read 258 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
गडगडणारे ढग हजारो

दुष्काळलेल्या धरणीस या
नभ पाणी आज पाजेल काय,.?
आस लागली हो मना-मनाला
जो गरजतोय तो बरसेल काय,..?

दुष्काळ पडला निसर्गात या
पाण्यासाठी खुमखुमी आहे
जरी गडगडणारे ढग हजारो
पण पडणाराची कमी आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783