Author Topic: तडका - सुट्ट्या संपल्याचा आनंद  (Read 320 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
सुट्ट्या संपल्याचा आनंद,...

दिर्घकाळ भेटलेल्या सुट्टीलाही
दिर्घकाळाचीच रजा असते
जुण्या आठवणींच्या जोडीला
नव्या क्षणांची मजा असते

शाळेचा पहिला दिवस सदैव
उत्सुकतेत पहूडलेला असतो
अन् सुट्ट्या संपल्याचा आनंद
मना-मनात वाढलेला असतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३