Author Topic: तडका - विरोधी पक्ष  (Read 316 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,478
तडका - विरोधी पक्ष
« on: July 16, 2015, 08:51:16 AM »
विरोधी पक्ष

प्रत्येकाच्या हिशोबाच्याही इथे
वेग-वेगळ्या पुड्या असतात
राजकीय डाव साधत कधी
नव-नव्या कुरघोड्या असतात

सत्ताधार्‍यांवरतीही कधी-कधी
विरोधी वारे फिरलेले असतात
अन् विरोध करण्यासाठी मात्र
विरोधी पक्ष ठरलेले असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता