Author Topic: तडका - भविष्य विद्यार्थ्यांचे  (Read 415 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,492
भविष्य विद्यार्थ्यांचे

जिथे पोषक आहार मिळावा
तिथे विष प्रहार होतो आहे
विद्यार्थ्यांना विषबाधा होणे
हा प्रकार समोर येतो आहे

जेवनातुन विषबाधा होणे
असे प्रकारच घडू नयेत
ज्यांच्या हाती भविष्य आहे
त्यांचे भविष्य बिघडू नयेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३