Author Topic: तडका - दुष्काळी पर्यटन  (Read 289 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - दुष्काळी पर्यटन
« on: August 12, 2015, 06:58:38 AM »
दुष्काळी पर्यटन

वरचे आलेत फिरून जातील
खालचेही येऊन फिरून जातील
दुष्काळी भागाच्या दौर्‍यासाठीही
कुणी उदंड खर्च करुन जातील

आता नव्या-नव्या दौर्‍यांचीही
रोज-रोज नविन खबर येते
दुष्काळाच्या नावानं का होईना
पण पर्यटन मात्र जबर होते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता