Author Topic: तडका - स्मार्ट सिटी करताना  (Read 312 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
स्मार्ट सिटी करताना

विकासा साठी प्राधान्यानं
शहरांकडे फोकस जातोय
स्मार्ट सिटीच्या चर्चेचाही
भरभराटीने विकास होतोय

शहरांचा विकास करण्या
जरूर कर्तव्यदक्ष असावं
पण जरा सरकार कडून
खेड्यांकडेही लक्ष असावं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३