Author Topic: तडका - विचार विचारवंतांचे  (Read 373 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
विचार विचारवंतांचे

पुरोगामित्वाचा विचार
समाजात पटत जातो
मारल्यानंही मरत नाही
तो जास्तच पेटत जातो

विचारवंत मरतील कदाचित
विचार मात्र जिवंत राहतील
क्रांतीकारकांचे कार्य देखील
त्रिकालबाधित ज्वलंत राहतील

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३